Saturday, May 18, 2013


'मेलेल्या लोकांचा देश'  
 
आम्ही जर जिवंत असतो
तर राजकारणी असे मातले नसते
पिढ्यानपिढ्या घराणेशाहीचे
ओझे आमच्यावर लादले नसते
 
आम्ही जर जिवंत असतो
तर नोकरशहांचे फावले नसते
बरबटलेले भ्रष्ट हात
जागेवरती राहिले नसते
 
आम्ही जर जिवंत असतो
तर स्त्रियांवर बलात्कार झाले नसते
हातात ताठ लिंग धरून
बलात्कारी फिरले नसते
 
आम्ही जर जिवंत असतो
तर दुश्मन पुढे आले नसते
आमच्या देखत स्वदेशाचे
लचके त्यांनी तोडले नसते
 
पण हे घडत आहे
याचे कारण उघड आहे
इथे कुणी हयात नाही
हा मेलेल्या लोकांचा देश आहे... 
 
                  - अमितेय   

No comments: