Thursday, March 4, 2021
इथे मूलनिवासी कुणीही नाही !
Thursday, December 17, 2020
कुतुबमिनार, की हिंदू विजयस्तंभ ?
भा.ज.प. चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य भा.ज.प. चे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी हे एक लेखक आणि इतिहास अभ्यासकही आहेत. 'कुतुब मिनार - भारताच्या इतिहासावरील दरोड्याचा साक्षीदार' नामक त्यांचं पुस्तक (प्रकाशक- विराट प्रकाशन, पुणे.) अलीकडेच वाचनात आलं. त्यात त्यांनी कुतुब मिनार हा मुसलमानी मिनार नसून भारतीय हिंदू परंपरेतील विजयस्तंभ असावा अशी शंका प्रदर्शित केली आहे. त्यांचं म्हणणं थोडक्यात खाली मांडतो.
Wednesday, November 25, 2020
एक महत्वाचा दुर्लक्षित शक : सीरियन शक
माझ्या मते प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करत असताना अभ्यासकासाठी सीरियन शकाचा (Syrian Saka) संदर्भ लक्षात घेणं अपरिहार्य आहे. पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. त्यामुळे इतिहासाच्या मांडणीत मूलगामी चुका आढळतात. खालील विवेचनावरून हे स्पष्ट होईल.
Saturday, August 8, 2020
रामजन्मभूमी वादातील खरे खलनायक
पुरातत्व खात्याचे भूतपूर्व संचालक डॉ. के. के. मुहंमद यांनी मल्याळम भाषेत आत्मचरित्र लिहिलं आहे. त्याचा 'मै भारतीय हूं !' हा हिंदी अनुवाद प्रभात प्रकाशन नामक संस्थेने प्रकाशित केला आहे. या आत्मचरित्राचा इंग्रजी किंवा मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे का याची मला माहिती नाही. पण महाजालावर वाचायला मिळतं त्याप्रमाणे डॉ. मुहंमद यांनी या आत्मचरित्रात स्पष्टपणे म्हटलं आहे, की हिंदू आणि मुसलमानांमध्ये रामजन्मभूमीचा प्रश्न परस्पर सौहार्दाने सुटण्याच्या बेतात असताना प्रत्येक वेळी मार्क्सवादी विचारसरणीच्या इतिहासकारांनी त्यात जाणून बुजून मोडता घातला आणि तो प्रश्न चिघळत राहील असं पाहिलं. याबाबतीत रोमिला थापर, बिपीनचंद्र आणि सर्वपल्ली गोपाल या इतिहासकारांनी १९ व्या शतकाच्या पूर्वी मंदिर असल्याचा व ते पाडून मशीद बांधल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचा आधारहीन दावा केला होता आणि इरफान हबीब, राम शरण शर्मा, डी. एन. झा, सुरज भान व अथर अली या अन्य डाव्या इतिहासकारांनी त्यांचा हा दावा उचलून धरला होता. या इतिहासकारांनी मुस्लिम पक्षकारांचं एकप्रकारे 'ब्रेन वॉशिंग' च केलं. अनेक डावे राजकीय पक्ष आणि संस्था यांनीही याचा फायदा उठवून हा प्रश्न सुटू नयेत म्हणून सातत्याने प्रयत्न केले.
Friday, April 17, 2020
राखीगढीचा 'यू टर्न'
Thursday, September 6, 2018
(The message of Rakhigarhi)
Monday, July 9, 2018
दोन वेळा भारत सरकारचा 'पद्मभूषण' 'किताब नाकारणाऱ्या रोमिलाबाईंनी २००८ साली पाच लाख डॉलरचं (साडेतीन कोटी रुपये) 'क्लुग' नामक अमेरिकन पारितोषिक स्वीकारायला मात्र अनमान केला नाही. कम्युनिस्टांचा अड्डा असणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्यांनी प्रदीर्घ काळ अध्यापन केलं आहे. २०१८ साली काही माओवादी विचारवंतांना पोलिसांनी अटक केल्यावर त्याविरोधात पहिली याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या रोमोलाबाईंनी आपण कोण आहोत हे पुन्हा एकदा कृतीनेच सिद्ध केलं होतं.
राम शरण शर्मा यांचीही सगळी मांडणी मार्क्सवादी आणि हिंदू विरोधी असल्याचं दिसून येतं. 'प्राचीन भारत' नामक दहावीच्या पाठ्यपुस्तकात 'रामायण आणि महाभारत घडलं याला काही पुरावा नाही' असं ठाम विधान करून त्यांनी तरुण मुलांच्या मनात भारतीय इतिहासाविषयी संदिग्धता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्या पुस्तकावर १९७७ मध्ये जनता पक्षाला बंदी घालावी लागली होती. अयोध्या आणि गुजरात दंगल प्रकरणांमध्ये शर्मा यांनी नेहमीच मुसलमानांची बाजू घेतली आहे. अयोध्या हे हिंदूंचं तीर्थक्षेत्र असल्याचा कुठलाही पुरावा नाही असं ते ठासून सांगतात.
कॉ. शरद पाटील यांनीही आर्यांपेक्षा अनार्यांची संस्कृती कशी 'उच्च' होती हे सांगण्यात हयात घालवली आहे. याबाबतीत त्यांची मजल एवढ्या पुढे गेलीय, की 'वर्णव्यवस्था ही मुळात अनार्यांची होती व ती पुढे आर्यांनी उचलली' असं सांगायलाही त्यांनी कमी केलेलं नाही. मात्र आधीची व्यवस्था 'समतेवर' आधारित होती तर नंतरची (म्हणजे आर्यांची) 'विषमतेवर' आधारित बनली' (पृ. ५, प्रस्तावना, 'दासशूद्रांची गुलामगिरी' खंड १ भाग २) असं निराधार विधान करून त्यांनी तो विषय गुंडाळला आहे. 'नैऋती' या वेदातील 'अशुभा'च्या देवतेला ते अनार्यांची देवता ठरवून 'सुपीकतेची'ही देवता ठरवायला जातात (पृ. ३ व ४) हा सुद्धा असाच एक निरर्थक अभिनिवेशाचाच प्रकार होय.
नरहर कुरुंदकर हे एकाच वेळी अनेक डगरींवर हात ठेवणारे महाराष्ट्रातील एक 'तुच्छतावादी' विद्वान. आपण 'मार्क्सवादी' असल्याची कबुली त्यांनी 'मनुस्मृती' या त्यांच्या पुस्तकात दिली आहे. (पृ. ८७ पहा.) 'मनू अस्पृश्यता पाळत नाही' असं डॉ. आंबेडकरांचं मत होतं. पण कुरुंदकर त्यांना खोडून काढतात व म्हणतात, 'मनू अस्पृश्यता पाळतो असे माझे मत आहे.' (पृ. ६५) या विधानाच्या पुष्ट्यर्थ कुरुंदकर 'प्रक्षिप्त' म्हणून उघडपणे माहीत असलेल्या श्लोकांची तीच तीच उदाहरणे देत राहतात. चार्वाकाला तर कुरुंदकर आर्यांपेक्षा अधिक मार्क देतात आणि 'ते काळाच्या १५०० वर्षे पुढे होते' असं आधारहीन विधान करतात. (पहा, 'लोकायत' हा लेख, मागोवा, देशमुख आणि कं.)
